Police Bharti Marathi Vyakaran | मराठी व्याकरण प्रश्न उत्तरे टेस्ट-1
Marathi Grammar
मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. व्याकरण भाषेचा मागोवा घेते. पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असे नाव दिले आहे. वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग व्याकरण करते. मराठी भाषेचे व्याकरण हे आधुनिक इंडो-आयर्न भाषांशी साधर्म्य दाखवते. आधुनिक मराठी भाषेचे व्याकरणाचे पहिले पुस्तक हे विल्यम केरी यांनी इंग्रजी भाषिक गटांसाठी १८०५ मध्ये प्रकाशित केले.
मराठी वाक्य हे प्रामुख्याने कर्ता, कर्म व क्रियापद यांचे बनलेले असते. मराठीचा पहिला व्याकरण ग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला.
